[t4b-ticker]
ब्रेकिंग

मानखुर्द-गोवंडीतील अस्वच्छतेवर आयुक्त अश्विनी भिडे यांचा ‘वॉर मोड’; आकस्मिक पाहणीत अधिकाऱ्यांना फटकार

दिवसातून दोन सत्रांत कचरा संकलन, वाहनांच्या फेऱ्या वाढवा; सीसीटीव्ही आणि दंडात्मक कारवाईचे आदेश

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई | प्रतिनिधी
पूर्व उपनगरातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेची स्थिती सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी सकाळी आकस्मिक पाहणी करत प्रशासनाला ‘वॉर मोड’मध्ये काम करण्याचे निर्देश दिले. कचरा संकलनासाठी कार्यरत कॉम्पॅक्टर वाहनाच्या मार्गाची प्रत्यक्ष तपासणी करत त्यांनी स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटींचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले.
आयुक्तांनी मानखुर्द आणि गोवंडी रेल्वे स्थानक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौक्यांना भेट देऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरी नोंद, उपलब्ध यंत्रसामुग्री आणि दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी एम-पूर्व विभागात दिवसातून दोन सत्रांमध्ये कचरा संकलन करण्याचे, कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या वाढविण्याचे, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी कॉम्पॅक्टर वाहनाच्या संपूर्ण मार्गाची आकस्मिक तपासणी करून कचरा संकलनाची प्रत्यक्ष कार्यपद्धती बारकाईने पाहिली. स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि उत्तरदायी करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधताना त्यांनी दैनंदिन कचरा संकलन आणि कचऱ्याच्या वर्गीकरणाची माहिती घेतली. झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये ‘ओला-सुका कचरा’ वर्गीकरणाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मानखुर्द आणि गोवंडी रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना उभी असलेली बेवारस वाहने आणि वाढती अस्वच्छता यावरही आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. विशेष मोहीम राबवून बेवारस वाहने हटवावीत आणि येत्या काही दिवसांत संपूर्ण परिसर स्वच्छ व अतिक्रमणमुक्त करावा, असे स्पष्ट आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
या पाहणीवेळी उपआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ-५) संध्या नांदेडकर, एम-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128