[t4b-ticker]
ब्रेकिंग

वरळी-प्रभादेवीत ३-४ दिवस कचरा संकलनावर परिणाम; बीएमसीची नवी एकात्मिक यंत्रणा सुरू

नव्या व्यवस्थेमुळे कमी होतील कचरा गाड्या, दुर्गंधी आणि प्रदूषण; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई | प्रतिनिधी
वरळी आणि प्रभादेवी परिसरातील कचरा संकलन व वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलण्याच्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. ‘जी दक्षिण’ विभागात नवीन एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, जुन्या आणि नव्या यंत्रणेतील सेवाबदलामुळे पुढील ३ ते ४ दिवस कचरा संकलनावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि उपायुक्त किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रशासन आणि नव्या कंत्राटदारांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकाच यंत्रणेकडे संपूर्ण जबाबदारी
यापूर्वी कचरा संकलन, वाहतूक, डब्यांची देखभाल, लिटर बिन्सची स्वच्छता आणि सुका कचरा उचलणे ही कामे वेगवेगळ्या यंत्रणांकडून केली जात होती. आता या सर्व सेवा एकाच कंत्राटदाराकडे सोपविण्यात येणार आहेत. त्यामुळे जबाबदारी निश्चित होऊन कामकाज अधिक वेगवान आणि परिणामकारक होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
रोजच्या ७,२०० मेट्रिक टन कचऱ्यासाठी आधुनिक व्यवस्था
मुंबईत दररोज सुमारे ७,२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा अधिक कार्यक्षम पद्धतीने हाताळण्यासाठी आता मोठ्या वहनक्षमतेची, बंदिस्त आणि आधुनिक वाहने वापरण्यात येणार आहेत. या वाहनांमुळे रस्त्यावर कचरा सांडणार नाही, ओल्या कचऱ्याचे सांडपाणी बाहेर पडणार नाही आणि दुर्गंधीवरही नियंत्रण मिळेल. तसेच वाहनांची संख्या कमी झाल्याने वाहतूक आणि वायू प्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा आहे. एकूण वाहनांपैकी १० ते १५ टक्के वाहने इलेक्ट्रिक असणार असल्याने इंधन बचतीलाही चालना मिळणार आहे.
आठ कंत्राटदार, टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
या नव्या व्यवस्थेसाठी मुंबईत आठ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने प्रकल्प राबविला जाणार आहे. ३ ऑगस्टपासून ‘जी दक्षिण’ विभागात या योजनेची सुरुवात झाली आहे. सध्या जुनी यंत्रणा पूर्णपणे बदलून नवी व्यवस्था उभी केली जात असल्याने काही दिवस कचरा संकलनात अडचणी निर्माण होत आहेत.
महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, हा संक्रमणकाल केवळ ३ ते ४ दिवसांचा असून त्यानंतर सेवा पूर्ववत आणि अधिक सक्षम स्वरूपात सुरू होईल. तोपर्यंत वरळी, प्रभादेवी आणि परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128