[t4b-ticker]
ब्रेकिंग

सायन रेल्वे पुलाचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापौर रितू तावडे यांची पाहणी

दर्जेदार फिनिशिंगसह हिरवळ व व्हर्टिकल गार्डन उभारण्याच्या सूचना

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]


मुंबई | प्रतिनिधी : सायन रेल्वे स्थानकाजवळील तब्बल ११२ वर्षे जुन्या आणि असुरक्षित ठरलेल्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला आता वेग आला असून, ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत हा पूल पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बुधवारी (२ सप्टेंबर) सायंकाळी या कामाची पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
पुलाचे काम वेगाने अंतिम टप्प्याकडे जात असल्याबद्दल महापौरांनी समाधान व्यक्त केले. मात्र, केवळ पूल वेळेत पूर्ण करणे नव्हे, तर त्याचे फिनिशिंग दर्जेदार आणि आकर्षक असावे, यावर त्यांनी विशेष भर दिला. पुलाच्या दुभाजकांवर तसेच दोन्ही बाजूंना हिरवळ विकसित करण्याबरोबरच व्हर्टिकल गार्डनसारखे पर्यावरणपूरक पर्याय तपासावेत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दोन्ही गर्डरचे डेक स्लॅब पूर्ण
मध्य रेल्वेकडून मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP-2) अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचवी आणि सहावी अतिरिक्त रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी जागा उपलब्ध करून देताना सायन स्थानकाजवळील जुना पूल पुनर्बांधणीसाठी घेण्यात आला आहे.


रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाचे काम मध्य रेल्वेकडून, तर महानगरपालिका हद्दीतील पोहोचमार्गाचे नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम रेल्वेच्या समन्वयाने महापालिकेच्या पूल विभागाकडून केले जात आहे. या प्रकल्पाचा खर्च रेल्वे विभागाच्या निधीतून करण्यात येत आहे.
वाहतूक पोलिसांच्या ना-हरकत परवानगीनंतर १ ऑगस्ट २०२४ पासून जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी काम दोन टप्प्यांत हाती घेण्यात आले.
सध्या मध्य रेल्वेकडून पुलाच्या दोन्ही गर्डरचे काम वेगाने सुरू आहे. दोन्ही गर्डरच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून क्रॅश बॅरिअर आणि काँक्रिट वेअरिंग कोटचे काम सुरू आहे. नवीन पादचारी पुलाचे बांधकाम पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. पुलाच्या उर्वरित भागाचे निष्कासनही पूर्ण झाले आहे.
फेब्रुवारी २०२७ची मुदत; मात्र सप्टेंबरमध्येच पूल सुरू करण्याचे प्रयत्न
निविदेनुसार या प्रकल्पाची अंतिम मुदत फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन त्यापूर्वीच काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेसोबत समन्वय साधून ३० सप्टेंबरपर्यंत पूल पूर्ण करून शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
दरम्यान, पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहिदास मार्ग (धारावी) या दरम्यानच्या पोहोचमार्गाच्या पुनर्बांधणीचे कामही प्रगतिपथावर आहे. पादचाऱ्यांसाठी लाल बहादूर शास्त्री मार्गावरील नवीन भुयारी मार्ग २० फेब्रुवारी २०२६ रोजी, तर संत रोहिदास मार्गावरील पुनर्बांधणी केलेला भुयारी मार्ग १४ जुलै २०२६ रोजी नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
‘वेळेत काम पूर्ण करा, पण दर्जाशी तडजोड नको’
पाहणीदरम्यान महापौर रितू तावडे यांनी संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेत काम निर्धारित वेळेत आणि वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पुलाच्या अंतिम टप्प्यातील फिनिशिंगचे काम उच्च दर्जाचे असावे, दुभाजकांवर हिरवळ विकसित करावी आणि व्हर्टिकल गार्डनच्या माध्यमातून परिसर अधिक सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणीवेळी एफ दक्षिण व एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष मानसी सातमकर, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128