Breaking
ब्रेकिंगराजकिय

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या शिक्षण पोषणासाठी ३१. फिरती पथके

महिला आणि बाल विकास विभागाचा निर्णय

0 0 2 1 1 7

 

प्रतिनिधी, मुंबई

१९ जून, मुंबई

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना समाजाच्या व शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणून व त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सर्वंकष योजना म्हणून फिरते पथक ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत मुंबईसह राज्यातील 28 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये एकूण 31 फिरती पथके स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाने दिली आहे.

सदर रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे फिरते पथक या उपक्रमाच्या माध्यमातून समुपदेशन करून त्यांना त्यांच्या वयानुसार अंगणवाडी, प्राथमिक शाळा यामध्ये दाखल करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार बालगृहात किंवा खुले निवारागृह येथे दाखल करून त्यांची रस्त्यावरील परिस्थितीतून सोडवणूक करणे व औपचारिक शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे हा मुख्य उद्देश असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुलांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार योग्य ते वैद्यकीय उपचार करणे, व्यसनाधीनता, कुपोषण, शारीरीक व्यंग इ. समस्या असतील तर सबंधित शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे हा उद्देश आहे. 2022 पासून राज्यात प्रायोगिक तत्त्वावर सहा फिरती पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकांना मिळालेला प्रतिसाद पाहता आता या फिरत्या पथकांची व्याप्ती राज्यभर वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

कोण असतील योजनेचे लाभार्थी ?

कोणाच्याही मदतीशिवाय रस्त्यावर अगदी एकटी राहणारी मुले , या अंतर्गत कुटुंबियांनी
सोडून दिल्याने रस्त्यावर राहणारे एकल बालक/विशेष गरजा असलेले बालक, कोणत्याही कारणास्तव घरापासून वेगळी होऊन रस्त्यावर राहणारी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी छोटी-छोटी कामे करणारी सर्व अनाथ मुले यांचा समावेश असणार आहे. अशी मुलं जी दिवसभर रस्त्यावर राहतात आणि रात्री जवळपासच्या वस्तीत/झोपडपट्टीत
राहणा-या त्यांच्या कुटुंबात परततात, बाल कामगार, विटभट्टी कामगारांची मुले, ऊसतोड कामगारांची मुले, बाल भिक्षेकरी, कचरा वेचक, रेल्वे स्टेशनच्या फलाटावर राहून छोटी-छोटी काम करणारी मुले, वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत राहणारी आणि रस्त्यावर काम करणारी मुले, वेश्या व्यवसाय करणा-या पालकांची मुले / वेश्या व्यवसाय ज्या भागात चालतो (रेड लाईट एरीया) त्या भागात राहणारी व तेथील रस्त्यांवर भटकणारी मुले, भावंडांची काळजी घेणारी मुले, रस्त्यावर राहणारी व अंमली पदार्थांचे सेवन करणारी मुले, रस्त्यावर आपली कला सादर करणारी मुले, गाड्यांचे वींड स्क्रीन इत्यादी साफ करणारी मुले, देवस्थानाच्या, तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी हार फुले विकणे/गंध लावणे / देवांच्या मुर्ती/फ्रेम विकणे / भिक्षा मागणे तसेच इतर अनेक प्रकारची कामे करणारी मुले इत्यादी मुलांचा समावेश असणार आहे
तर आपल्या कुटुंबासोबत रस्त्यावर राहणारी मुलांचाही यात समावेश असणार आहे.

योजनेची व्याप्ती

सदर योजनेतंर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता २८ महानगरपालिका क्षेत्रांत प्रत्येकी १ तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई शहरासाठी १, मुंबई उपनगर (पुर्व) साठी १ व मुंबई उपनगर (पश्चिम) साठी १ याप्रमाणे एकूण ३१ “फिरते पथक” सुरु करण्यात येणार असून त्यानंतर. नगर पालिका क्षेत्रे व देवस्थाने / धार्मिक स्थळे यांचा समावेश करुन सदर फिरते पथकांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे.

काय असेल योजना?
रस्त्यावरील बालकांसाठी एक बस व्यान एनजीओच्या माध्यमातून सुरू करण्यात येईल.
सदर बस/व्हॅनमध्ये किमान एक समुपदेशक, एक शिक्षक/शिक्षिका, एक वाहन चालक आणि एक काळजी वाहक असे एकूण ४ कर्मचारी उपस्थित असणार आहेत. यामध्ये किमान २ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. बस/व्हॅन ची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशी असेल. सदर व्हॅन जिल्ह्यातील /शहरातील गर्दीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी रस्त्यावरील मुलांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी फिरेल. मनपा क्षेत्रातील/शहरातील रस्त्यावरील सर्व मुलांना याचा फायदा होईल.
सदर वाहनात सीसीटीव्ही कॅमेरा तसेच जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा असणार आहे. या बस / व्हॅनमध्ये दाखल केलेल्या बालकांचे आधार कार्ड काढण्यात येणार असून त्यांची जवळच्या शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करुन घेण्यात येईल. तपासणीनुसार आवश्यक ते उपचार करण्यात यावेत. तसेच त्यांच्या वयोगटाप्रमाणे आवश्यक ते लसीकरणही करून घेण्यात येणार आहे. प्रत्येक मुलाला देण्यात येणारा आहार त्याच्या वयोगटाप्रमाणे पुरेसा असेल तसेच दिले जाणारे अन्न हे ताजे, स्वच्छ रुचकर व पोषक असावे याची दक्षता संस्थेने घ्यावी लागेल असेही त्यांनी सांगितले..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

पालिकानामा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 1 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे