[t4b-ticker]
ब्रेकिंग

सायन रुग्णालयात आता डिजिटल पेमेंटची सुविधा; कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर ‘एआय’ची नजर

पॉस मशीनसह स्वतंत्र डिजिटल पेमेंट काऊंटर सुरू करण्याचे निर्देश; हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमची प्रभावी अंमलबजावणी

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई/ प्रतिनिधी :

सायन येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आता विविध वैद्यकीय सेवांचे शुल्क भरण्यासाठी रोख रकमेवर अवलंबून राहावे लागणार नाही. एक्स-रे, एमआरआय, बाह्यरुग्ण विभागाचे केस पेपर तसेच अन्य वैद्यकीय सेवांसाठी डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले.
रुग्णालयाच्या क्षमतावाढ प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी वर्मा लवंगारे यांनी शनिवारी (८ ऑगस्ट) रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आपत्कालीन विभाग, विविध कक्ष, एमआयसीयू, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, मुख्य रुग्णालय इमारत टप्पा क्रमांक २-अ तसेच ऑन्कोलॉजी इमारतीतील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
रांगा कमी करण्यासाठी स्वतंत्र डिजिटल काऊंटर
रुग्णालयात विविध सेवांसाठी नागरिकांना सध्या रोख स्वरूपात शुल्क भरावे लागते. त्यामुळे पॉस मशीन उपलब्ध करून देण्याबरोबरच डिजिटल पेमेंटसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डिजिटल व्यवहाराचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे रुग्णालयातील रांगा कमी होऊन नागरिक, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक सुलभ सेवा मिळेल, असे वर्मा लवंगारे यांनी स्पष्ट केले.
कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर ‘एआय’ची नजर
रुग्णालयातील कर्मचारी वेळेपूर्वी कामावरून निघून जात नाहीत ना, यावरही प्रशासनाची नजर राहणार आहे. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून कर्मचारी वर्गाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची सूचनाही करण्यात आली.
महापालिका मुख्यालयातील मानव संसाधन विभागाकडून ‘एआय’च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर निगराणी ठेवली जात आहे. त्याच धर्तीवर रुग्णालयातील कर्मचारी उपस्थिती व्यवस्थाही अधिक प्रभावी करण्याचे निर्देश देण्यात आले.
‘हॉस्पिटल मॅनेजमेंट’ सिस्टिम अनिवार्य
रुग्णालयातील विविध वैद्यकीय आणि प्रशासकीय सेवा अधिक सुसूत्र करण्यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. नियंत्रण कक्षातून पब्लिक अॅड्रेस सिस्टिम कार्यान्वित करण्यासाठीही आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात आले.
रुग्णांसाठी अडथळामुक्त पदपथ, डॉक्टरांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे
क्षमतावाढ प्रकल्पांतर्गत नव्याने विकसित होणाऱ्या रुग्णालयात नागरिकांसाठी तसेच निवासी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळ्याची स्वतंत्र ठिकाणे विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण परिसरात नागरिकांना सहजपणे चालता यावे यासाठी अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.
स्वच्छतेला प्राधान्य; मूषक-श्वानांचा उपद्रव रोखणार
रुग्णालय परिसरात नियमित स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. कर्मचारी वर्गासाठी विशिष्ट गणवेश उपलब्ध करून देण्याबरोबरच रुग्णालय परिसरात मूषक आणि भटक्या श्वानांचा उपद्रव होणार नाही, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आले.
या पाहणीवेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, सहायक आयुक्त (एफ उत्तर) अरुण क्षीरसागर यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128