[t4b-ticker]
ब्रेकिंग

महापौर बंगल्याचे आवार नागरिकांसाठी खुले; स्वातंत्र्यदिनी महापौर रितू तावडे यांचा अनोखा जनहिताचा निर्णय

स्वातंत्र्यदिनी महापौर रितू तावडे यांची मुंबईकरांना अनोखी भेट महापौर बंगल्याचे निसर्गरम्य आवार स्थानिक नागरिकांच्या ‘मॉर्निंग वॉक’साठी खुले

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]


मुंबई | प्रतिनिधी : मुंबईसारख्या धावपळीच्या महानगरात मोकळा श्वास घेण्यासाठी आणि आरोग्यदायी वातावरणात सकाळची प्रभातफेरी करण्यासाठी नागरिकांना हक्काची जागा मिळावी, यासाठी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वातंत्र्यदिनी अनोखा आणि जनहिताचा निर्णय घेतला आहे. भायखळा येथील महापौरांच्या शासकीय निवासस्थानाचा वृक्षराजींनी वेढलेला विस्तीर्ण परिसर आता स्थानिक नागरिकांच्या ‘मॉर्निंग वॉक’साठी खुला करण्यात आला आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत महापौर रितू तावडे यांनी आज, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी महापौर निवासस्थानी ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी स्वतः निवासस्थानाचे मुख्य प्रवेशद्वार नागरिकांसाठी खुले करून या विशेष उपक्रमाची सुरुवात केली.
सकाळी ६ ते ९ या वेळेत नागरिकांना प्रवेश
महापौर बंगल्यालगतच्या पदपथावरून थेट निवासस्थानाच्या विस्तीर्ण आवारात स्थानिक रहिवाशांना दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत प्रभातफेरी करता येणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे.
मुंबईत मोकळ्या आणि शांत जागांची कमतरता असताना, वृक्षांनी नटलेल्या या ऐतिहासिक परिसरात सकाळचा वेळ घालवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे आरोग्यासोबतच नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्याचा आनंदही घेता येणार आहे.


‘शासकीय बंगला’ नव्हे, नागरिकांसाठी आरोग्यदायी जागा
महापौरांचे निवासस्थान असलेला हा परिसर पुरातन वारसा अर्थात हेरिटेज श्रेणीतील असून, त्याच्या सभोवती मोठ्या प्रमाणात वृक्षराजी आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी येथील प्रसन्न वातावरण नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
महापौर रितू तावडे या बंगल्याच्या परिसरातील नागरिकांशी नियमित संवाद साधत असून, स्थानिकांच्या गरजा आणि समस्या जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यातूनच नागरिकांना सकाळच्या वेळी फिरण्यासाठी सुरक्षित, शांत आणि हिरवाईने नटलेली जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांशी थेट संवाद
फेब्रुवारी २०२६ मध्ये मुंबईच्या महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितू तावडे यांनी जून २०२६ च्या अखेरीस या शासकीय निवासस्थानात वास्तव्यास सुरुवात केली. अल्पावधीतच परिसरातील नागरिकांशी त्यांचा थेट संवाद वाढला आहे.
स्वातंत्र्यदिनी घेतलेला हा निर्णय केवळ मॉर्निंग वॉकची सुविधा उपलब्ध करून देणारा नसून, महापालिका प्रशासन आणि नागरिकांमधील दुरावा कमी करण्याचा संदेश देणारा उपक्रम ठरत आहे.
ज्येष्ठ नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत
मुंबईच्या गजबजाटात ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना सकाळी मोकळ्या वातावरणात चालता यावे, यासाठी महापौरांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे. महापौरांचा बंगला नागरिकांसाठी ‘ओपन स्पेस’ करण्याचा हा पुढाकार स्वातंत्र्यदिनी मुंबईकरांना मिळालेली आगळीवेगळी भेट ठरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128