[t4b-ticker]
ब्रेकिंग

महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांची केशवसृष्टीतील सहल रद्द करा; रईस शेख यांची मागणी

केशव सृष्टीत सहल म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण आमदार रईस शेख यांचा महापालिका प्रशासनावर घणाघात

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची भाईंदर-उत्तन येथील केशवसृष्टी येथे प्रस्तावित करण्यात आलेली शैक्षणिक सहल तातडीने रद्द करावी, तसेच महापालिका शिक्षण व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचे धार्मिक किंवा वैचारिक हस्तक्षेप होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी जोरदार मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवले आहे.
महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहल केशवसृष्टी येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला आहे. या सहलीवर महापालिका तब्बल २ कोटी ४३ लाख रुपये खर्च करणार असल्याचा दावा आमदार रईस शेख यांनी केला असून, हा प्रस्तावच रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
‘शैक्षणिक सहलीच्या नावाखाली वैचारिक संस्कार कशासाठी?’
केशवसृष्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीशी संबंधित संस्था असल्याचा उल्लेख करत रईस शेख यांनी महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या नावाखाली अशा संस्थेत नेणे हे केवळ पर्यटन किंवा पर्यावरण शिक्षणापुरते मर्यादित राहणार नाही, तर त्यातून विशिष्ट वैचारिक प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
“महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना धर्मनिरपेक्ष आणि संविधानिक मूल्यांवर आधारित शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. विशिष्ट धार्मिक अथवा वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या संस्थेला शैक्षणिक सहलीसाठी प्राधान्य देणे म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप रईस शेख यांनी पत्रातून केला आहे.
‘महापालिका कोणत्याही धार्मिक अजेंड्याचे साधन बनू नये’
महापालिका प्रशासन हे भारतीय राज्यघटनेला बांधील असून, राज्यघटनेची मूलभूत चौकट धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये कोणत्याही विशिष्ट धर्माचा किंवा विचारसरणीचा अप्रत्यक्ष प्रभाव पडणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेणे आवश्यक असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.
यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी श्रीरामांच्या चरित्रावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळीही विरोध झाला होता, अशी आठवण त्यांनी पत्रात करून दिली.
‘सत्ता कोणाचीही असो, संविधानिक मर्यादा पाळा’
महापालिकेवर कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी प्रशासनाला धार्मिक हेतूंसाठी शैक्षणिक यंत्रणेचा वापर करता येणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार रईस शेख यांनी दिला आहे.
“मुंबई महापालिकेला सामाजिक, धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक शिक्षणाची मोठी परंपरा आहे. या वारशाला तडा जाऊ देता कामा नये. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात राजकीय किंवा धार्मिक विचारसरणीचा हस्तक्षेप होऊ नये,” अशी मागणी करत त्यांनी केशवसृष्टीतील प्रस्तावित सहल तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128