[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईतील ५०० किमी रस्ते अतिक्रमणमुक्त; २,८०३ फेरीवाले, अतिक्रमणे हटवली!

३९९ पदपथांवर कारवाई; पदपथांवरील दुकाने, अनधिकृत पार्किंग आणि रॅम्पवरही महापालिकेचा बडगा

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]


विशेष प्रतिनिधी | मुंबई :
मुंबईतील पदपथांवर अतिक्रमण करणारे फेरीवाले, दुकानदार आणि वाहनचालकांनो सावधान! पादचाऱ्यांच्या मार्गातील अडथळे कायमस्वरूपी दूर करण्यासाठी महापालिकेने कारवाई तीव्र केली आहे. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मुंबईतील २६ प्रशासकीय विभागांमधील ३९९ पदपथांवरील २ हजार ८०३ अतिक्रमणे आणि फेरीवाले हटविण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सुमारे ५०० किलोमीटर लांबीचे रस्ते पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त झाले आहेत. केवळ दिखाऊ कारवाई न करता पदपथ कायमस्वरूपी मोकळे ठेवा, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रुग्णालये, शाळा आणि स्थानकांजवळ विशेष लक्ष
मुंबईकरांना सुरक्षितपणे आणि विनाअडथळा चालता यावे, यासाठी महापालिकेने ‘पादचारी प्रथम’ अभियान हाती घेतले आहे. रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, रेल्वे आणि बस स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणांवरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यावर भर दिला जात आहे. अतिक्रमणे हटविण्यासोबतच आवश्यकतेनुसार पदपथ रुंद करणे, दुरुस्ती करणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक शनिवारी (१७ ऑक्टोबर) वरळी येथील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये झाली. या बैठकीत आयुक्त भिडे यांनी कारवाईचा आढावा घेतला. पदपथांवर दुकाने, स्टॉल्स किंवा अन्य साहित्य ठेवून पादचाऱ्यांचा मार्ग अडविणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पदपथांवरील पार्किंगवरही कारवाई
पदपथांवर दुचाकींचे अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून नियमित देखरेख आणि कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहनतळासाठी आरक्षित जागांचा विकास करून त्या नागरिकांसाठी उपलब्ध कराव्यात. आवश्यक ठिकाणी नियोजनबद्ध पार्किंगचे पट्टे आखावेत आणि रस्त्यालगत स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करून अनधिकृत पार्किंगला आळा घालावा, असे आयुक्तांनी सांगितले.
अनधिकृत रॅम्प हटविणार
काही गृहनिर्माण संस्थांनी वाहनांच्या ये-जा करण्यासाठी पदपथांमध्ये अनधिकृत बदल करून रॅम्प तयार केले आहेत. अशा प्रकरणांची पाहणी करून संबंधित संस्थांना नोटिसा बजावाव्यात आणि अनधिकृत रॅम्प हटवून पदपथांची मूळ रचना पूर्ववत करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दुकाने आणि स्टॉल्सच्या पुनर्वसनाचीही तपासणी
पदपथांवरील अधिकृत दुकाने आणि स्टॉल्सचे स्थलांतर करताना मूळ जागेचे क्षेत्रफळ, अधिकृत नोंदी आणि मंजूर परवानग्यांची पडताळणी करावी. पुनर्वसनाच्या नावाखाली अनधिकृत विस्तार होणार नाही, याची दक्षता घेण्यास आयुक्तांनी सांगितले.
गॅरेज आणि वाहन विक्रेत्यांनाही इशारा
पदपथांवर वाहने उभी करून दुरुस्ती करणाऱ्या गॅरेज व्यावसायिकांसह पदपथ आणि रस्त्यालगतच्या जागेचा वाहनांच्या खरेदी-विक्रीसाठी अनधिकृत वापर करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. अतिक्रमणे हटविल्यानंतर पदपथांची तातडीने दुरुस्ती करून ते स्वच्छ, सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पदपथांचा वापर केवळ पादचाऱ्यांसाठीच व्हावा, यासाठी कारवाईत सातत्य राखण्याचे आदेश आयुक्त भिडे यांनी दिले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128