[t4b-ticker]
ब्रेकिंग

उत्तर मुंबईत सहा कौशल्य केंद्रे; तरुणाईला रोजगाराची नवी दारे

AIपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत प्रशिक्षण; ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठीचे वर्गही

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई /प्रतिनिधी :

उद्योगविश्वात झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन उत्तर मुंबईत सहा ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अत्याधुनिक तंत्रज्ञान, इन्क्युबेशन सेंटरसह उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देत तरुणाईला थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा राज्यातील महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज येथे कौशल्य विकास केंद्रासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) यांच्यात शनिवारी (५ सप्टेंबर) सामंजस्य करार करण्यात आला. या केंद्रासाठी महापालिकेने समाज कल्याण सुविधा भूखंड उपलब्ध करून दिला आहे.


या वेळी बोलताना गोयल यांनी सांगितले की, उद्योग जगताला मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित आणि अद्ययावत कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे कौशल्य विकास केंद्रे ही केवळ प्रशिक्षण देणारी केंद्रे न राहता उद्योगांच्या गरजा आणि रोजगाराच्या संधी यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरली पाहिजेत.
नोकरी करणाऱ्यांनाही ‘अपस्किलिंग’ची संधी
काम करणाऱ्या तरुणांसह विविध क्षेत्रातील मनुष्यबळाला नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे, यासाठी सायंकाळच्या वेळेत आणि आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची सूचना गोयल यांनी केली. बदलत्या रोजगार बाजारपेठेत टिकण्यासाठी विद्यमान कर्मचाऱ्यांनाही सातत्याने नवीन कौशल्ये शिकण्याची संधी देण्यात येणार आहे.
तरुणांना विविध भाषा शिकण्याची सुविधा केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच उत्तर मुंबईत कार्यरत ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठीही प्रशिक्षित मनुष्यबळ
उत्तर मुंबईत हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा विस्तार वेगाने होत आहे. या क्षेत्राला आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावे, यासाठी कौशल्य विकास केंद्रांमध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज गोयल यांनी व्यक्त केली.
मुंबईपुरते मर्यादित न राहता ग्रामीण महाराष्ट्रालाही फायदा
उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले की, मुंबई महानगर क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत असताना रिअल इस्टेटसह विविध क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. उद्योगांच्या मागणीनुसार प्रशिक्षित कामगार उपलब्ध करून देण्यात कौशल्य विकास केंद्रांची भूमिका निर्णायक ठरेल.
मुंबईसोबतच ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांनाही या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देता येतील, असा विश्वास घाडी यांनी व्यक्त केला.
उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षणावर भर
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि तंत्रज्ञानातील बदल यामुळे उद्योगांना सातत्याने अद्ययावत कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची गरज भासत आहे. त्यामुळे उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजा ओळखून त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे.
विशिष्ट उद्योगांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासोबतच नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आणि रोजगारक्षम मनुष्यबळाची संख्या वाढविण्यात कौशल्य विकास केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कराराच्या वेळी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, नगरसेविका निशा परुळेकर, नगरसेवक दीपक (बाळा) तावडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, NSDCचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी संजीव सिंह तसेच महिंद्रा समूह आणि लार्सन अँड टुब्रो समूहाचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128