प्रतिनिधी, मुंबई
२१ जून २०२५
मुंबई मेट्रो-७ अ प्रकल्प अंतर्गत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे, के पूर्व प्रभागातील, बामणवाडा अंधेरी (पूर्व) जवळ, वेरावली जलाशयाच्या (२४ x ७) कार्यान्वित असलेल्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या निगमवाहिनीखाली बोगदा खणन संयंत्राद्वारे खोदकाम करण्यात येणार आहे.
सदर खोदकाम रविवार, दिनांक २२ जून २०२५ पासून शनिवार, दिनांक २८ जून २०२५ या कालावधीत सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० पर्यंत आणि रात्री ९.३० ते मध्यरात्री नंतर ३.३० वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे के पूर्व विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यापाणी जपून व काटकसरीने वापरा चा तपशील पुढीलप्रमाणेः-
(१) विलेपार्ले (पूर्व) – सायंकाळी ५.०० ते रात्री ८.०० वाजेदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा
(२) जुना नागरदास मार्ग, नवीन नागरदास मार्ग, मोगरापाडा, अंधेरी-कुर्ला मार्ग (अंधेरी स्थानक ते पश्चिम द्रुतगती मार्ग) – रात्री ८.०० ते ९.३० वाजेदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा
कृपया संबंधित भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
