Breaking
ब्रेकिंग

सेंट जॉर्जच्या डॉ. कटके यांच्यामुळे महिलेला जीवदान 

पोटातून काढली १० किलोची गाठ

0 0 2 1 1 7

 

प्रतिनिधी, मुंबई

२८ जून २०२५

क्रॉफर्ड मार्केटजवळील सिताराब इमारतीत राहणाऱ्या ४० वर्षीय अविवाहित मीना सोलंकी यांच्या पोटातून डॉक्टरांनी सुमारे १० किलो ४०० ग्रॅम वजनाची गाठ यशस्वीरित्या काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या स्त्रीरोग आणि प्रसूती विभाग प्रमुख डॉ. राजश्री कटके यांनी शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. सुमारे दीड वर्षांपूर्वी टेबलाचा एक कोपरा मीना यांच्या पोटाला लागला होता. त्यानंतर वेदना होत होत्या मात्र उपचारांमुळे त्यांना काही आराम मिळाला होता. परंतु हळूहळू वेदना वाढू लागल्या आणि पोटाचा आकारही असामान्यपणे वाढू लागला. मासिक पाळीतही समस्या येत होत्या. गेल्या काही महिन्यांत मीन यांना उलट्या होऊ लागल्या आणि खाल्ल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. मे महिन्यात

डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न

सेंट जॉर्ज रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. चार तास चाललेल्या शस्त्रक्रियेत डॉ. कटके यांच्या पथकाने १०.४ किलो वजनाची गाठ काढून टाकली. ऑन्कोसर्जन डॉ. कोरेश, डॉ. शुभांगी आणि भूल देणाऱ्या पथकाच्या डॉ. पौर्णिमा सोनकांबळे आणि डॉ. रुची यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

कुटुंबीयांचे समुपदेशन

रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तयार नव्हती प्रथम तिचे आणि कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले. ही एक अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती, परंतु अनुभव आणि टीमच्या पाठिंब्यामुळे ती यशस्वीरित्या पार पडली असल्याचे स्रीरोग विभागाच्या डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले.

तोंडात अल्सर  झाल्यामुळे तिने खाणे बंद केले आणि ८ दिवस सतत उलट्या होत राहिल्या. अशक्तपणामुळे चालणेही कठीण झाले होते. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने त्यांचा भाऊ रमेश सोलंकी त्यांना सेंट जॉर् रुग्णालयात घेऊन आला. तपासणीत असे दिसून आले की त्यांच्या पोटामध्ये एक मोठी गाठ होती जी आतडे, फुफ्फुसे, यकृत, हृदय, मूत्रपिंडावर दाब देत होती. ही गाठ अनेक अवयवांना चिकटलेली होती आणि ती फुटण्याचा धोका होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

पालिकानामा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 1 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे