Breaking
ब्रेकिंग

म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समितीची स्थापना !

मुंबई महापालिकेचे कायम कामगारांचे काम ठेकेदारामार्फत करण्यासाठीचे टेंडर रद्द करा

0 0 2 1 1 7

 

विशेष प्रतिनिधी

7 मे मुंबई

मुंबई महानगरपालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत साफसफाई आणि परिवहन खात्यातील कामे ‘एरिया बेस’च्या नावाखाली ठेकेदारामार्फत करून घेण्यासाठी पालिका प्रशासनाने दि. १४/०५/२०२५ रोजी काढलेले टेंडर रद्द करा या मागणीसाठी विविध संघटनांनी सदर टेंडरला विरोध करण्यासाठी लेखी पत्रव्यवहार केलेला आहे. याबाबत म.न.पा. प्रशासनाकडून कोणत्याही संघटनेला कामगार-कर्मचाऱ्यांवतीने आपली बाजू मांडण्यासाठी संधी दिलेली नाही. म्हणून मुंबई महानगरपालिकेतील म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ, दि म्युनिसिपल युनियन, कचरा वाहतुक श्रमिक संघ, म्युनिसिपल मजदूर संघ आणि महापालिकेतील कामगार संघटना यांनी एकत्र येऊन ‘म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समिती’ची स्थापना केली आहे. म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबईच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीला म्युनिसिपल मजदूर युनियनच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर, , प्रफुल्लता दळवी उपस्थित होते. म्युनिसिपल कामगार सेनेच्यावतीने अध्यक्ष बाबा कदम, मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्यावतीने कार्याध्यक्ष शेषराव राठोड, सरचिटणीस संजीवन पवार दि म्युनिसिपल युनियनच्यावतीने सरचिटणीस रमाकांत बने, रंगनाथ सातवसे, म्युनिसिपल कामगार संघाच्यावतीने सरचिटणीस प्रकाश जाधव उपस्थित होते आणि कचरा वाहतुक श्रमिक संघाच्यावतीने अध्यक्ष अॅड्. दिपक भालेराव व सरचिटणीस मिलिंद रानडे उपस्थित होते.

महापालिका प्रशासनाने घन कचरा व्यवस्थापन खात्यातील साफसफाई आणि परिवहन खात्यातील कामाचे खाजगीकरण करण्याबाबत दि. १४ मे २०२५ रोजी टेंडर काढलेले आहे. त्यामुळे कामगार-कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आणि वारसाहक्क पध्दत बंद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने टेंडर काढून खाजगीकरण करण्याचे धोरण आखल्यामुळे घन कचरा व्यवस्थापक खात्यातील साफसफाई आणि परिवहन खात्यातील कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे. सदर टेंडर रद्द करण्यात यावे, यासाठी उपरोक्त संघर्ष समितीच्यावतीने कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये बुधवार दि. ११ जून २०२५ रोजी शिवाजी मंदीर, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८ येथे म.न.पा. प्रशासनाने एकतर्फीपणे सुरू केलेले खाजगीकरण रोखण्यासाठी कामगारांच्यावतीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दुपारी २.०० वा. प्रचंड मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. सदर मेळाव्यात कामगार-कर्मचारी आंदोलनाची भूमिका घेतील, अशी माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक वामन कविस्कर यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

पालिकानामा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 1 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे