[t4b-ticker]
ब्रेकिंग

नायगाव बीडीडी चाळीत महापालिका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पाण्याच्या टाकीची पाहणी करताना ५ ते ७ फूट उंचीवरून कोसळले; महापौर रितू तावडेंकडून कुटुंबीयांचे सांत्वन

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई/ प्रतिनिधी :

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागातील कीटकनाशक विभागात कार्यरत असलेले कामगार पांडुरंग तोडकर (४५) यांचा नायगाव बीडीडी चाळीत पाण्याच्या टाकीची पाहणी करताना ५ ते ७ फूट उंचीवरून खाली कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन तोडकर यांचा मुलगा साईराज तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून या दुःखद प्रसंगी महापालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
दरम्यान, तोडकर कुटुंबाला निवृत्ती वेतनासह नियमानुसार मिळणारे सर्व आर्थिक व सेवा लाभ तातडीने देण्याची प्रक्रिया सुरू करावी, तसेच त्यांच्या पात्र वारसाला महानगरपालिकेत नोकरी देण्याबाबतची कार्यवाही तत्काळ सुरू करावी, असे निर्देश महापौर तावडे यांनी प्रशासनाला दिले.
या वेळी सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, कीटकनाशक अधिकारी रितेश मारापे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128