[t4b-ticker]
ब्रेकिंग

गणेश मंडपासाठी आता ऑनलाइन ‘एक खिडकी’; 14 ऑगस्टपासून अर्ज, 13 सप्टेंबरपर्यंत मुदत

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा; पोलीस, वाहतूक पोलिसांचे ‘एनओसी’ही ऑनलाइनच — 2025 मध्ये एक वर्षाची परवानगी घेतलेल्यांना 1 किंवा 5 वर्षांचा पर्याय

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी | मुंबई :

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीची परवानगी मिळवण्यासाठी यंदाही ऑनलाइन ‘एक खिडकी’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवार, 14 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून मंडळांना 13 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. विशेष म्हणजे मंडप परवानगीसाठी स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ही याच ऑनलाइन प्रक्रियेतून मिळणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप उभारू इच्छिणाऱ्या मंडळांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील ‘नागरिकांकरिता – मंडप (सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रोत्सव/इतर उत्सव)’ या सुविधेतून अर्ज करायचा आहे. अर्जाची विभाग कार्यालयाकडून छाननी झाल्यानंतर संबंधित पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन ‘एनओसी’ घेण्यात येईल. त्यानंतर परिमंडळीय उपआयुक्तांच्या मंजुरीनुसार मंडप परवानगीची पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.
2025 मध्ये एक वर्षाची परवानगी? आता 5 वर्षांचा पर्यायही
गतवर्षी केवळ एका वर्षासाठी मंडपाची परवानगी घेतलेल्या मंडळांना यंदा मोठी सुविधा देण्यात आली आहे. अशा मंडळांना 2026 साठी एक वर्षाची किंवा 2026 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीची परवानगी घेता येणार आहे.
तर यापूर्वी पाच वर्षांची परवानगी मिळालेल्या मंडळांना 2026 साठी ऑनलाइन नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्यक्ष पाहणीमध्ये मंडपाची जागा आणि क्षेत्रफळ मंजूर परवानगीनुसार असल्याची खातरजमा झाल्यानंतर पोलीस व वाहतूक पोलिसांचे ‘एनओसी’ घेऊन नूतनीकरण केले जाईल.
नव्या मंडळांना 100 रुपयांत परवानगी
सार्वजनिक किंवा खासगी जागेवर प्रथमच गणेश मंडप उभारणाऱ्या मंडळांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. विभाग कार्यालयाकडून छाननी, पोलीस व वाहतूक पोलिसांचे ‘एनओसी’ आणि परिमंडळीय उपआयुक्तांची मंजुरी झाल्यानंतर 100 रुपये शुल्क भरून मंडप परवानगी देण्यात येईल.
पाच वर्षांची परवानगी असलेल्या मंडळांच्या नूतनीकरणासाठीही 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
उच्च न्यायालयाचे आदेश सर्व मंडळांना बंधनकारक
सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने न्यायालयाकडून वेळोवेळी दिले जाणारे आदेश सर्व गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक राहतील. या आदेशांच्या अधीन राहूनच मंडप उभारणीची परवानगी दिली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
रस्ते-पदपथांवर खड्डे खोदल्यास कारवाई
गणेश मंडप उभारताना रस्ते किंवा फूटपाथवर खड्डे खोदण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. मंडप उभारणीसाठी खड्डेविरहित तंत्राचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. रस्ते किंवा पदपथांचे नुकसान करणाऱ्या मंडळांवर संबंधित नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे.
याशिवाय जाहिरात फलक, अग्निसुरक्षा आणि अनुज्ञापन विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे मंडळांना बंधनकारक राहणार आहे.
प्रत्येक मंडळाचे दोन स्वयंसेवक प्रशिक्षित होणार
गणेशोत्सवातील गर्दीचे नियोजन, अग्निसुरक्षा आणि प्रथमोपचार याबाबत महापालिका विभाग कार्यालयाच्या स्तरावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेणार आहे. प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे दोन स्वयंसेवक या प्रशिक्षणाला उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी 13 सप्टेंबरपर्यंतच अर्ज
गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी 14 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. मंडप परवानगीची वैधता 26 सप्टेंबर 2026 पर्यंत राहणार आहे.
नवरात्रोत्सवासाठी मंडप परवानगीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2026 दरम्यान सुरू राहणार असून, त्याची परवानगी 21 ऑक्टोबर 2026 पर्यंत वैध असेल.
महापालिकेने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणेही मंडळांसाठी बंधनकारक राहणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128