ब्रेकिंग
शीतल तलावात बुडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
अग्निशमन दलाची बचावमोहीम; रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित केले
[wps_visitor_counter]
[responsivevoice_button voice="Hindi Female"]
[metaslider id="1367"]
-
मुंबई | प्रतिनिधी
कुर्ला (पश्चिम) येथील एल.बी.एस. मार्गावरील शीतल तलावात शुक्रवारी सकाळी १९ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य दिलीप तायडे (वय १९) हा शीतल तलावात बुडाल्याची माहिती सकाळी सुमारे ११.४९ वाजता मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलिस, १०८ रुग्णवाहिका, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तसेच बृहन्मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य हाती घेत तलावातून आदित्यला बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी नोंद करून घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, तरुण तलावात कसा बुडाला याबाबत चौकशी सुरू आहे.
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]