[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईतील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीसांना दिवाळीला ७ हजार रुपयांची भाऊबीज

गतवर्षीपेक्षा २ हजार रुपयांची वाढ; दिवाळीपूर्वी खात्यात रक्कम जमा होणार

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी मुंबई :

मुंबई महापालिकेच्या अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांसाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी आहे. यंदा त्यांना दिवाळी भाऊबीज म्हणून प्रत्येकी ७ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाऊबीज रकमेत २ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम सर्व पात्र शिक्षिका आणि मदतनीसांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, अशी माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहायक सरचिटणीस अरुण नाईक यांनी दिली.
महापौर रितू तावडे यांच्या सकारात्मक पुढाकारानंतर बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी महापालिका मुख्यालयात भाऊबीज रकमेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीत अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना गतवर्षीच्या तुलनेत २ हजार रुपये अधिक, म्हणजेच प्रत्येकी ७ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीपूर्वी ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत.

या बैठकीला महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सभागृह नेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्यासह विविध पक्षांचे गटनेते आणि महापालिका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल म्युनिसिपल मजदूर युनियन आणि समन्वय समितीने महापौर, विरोधी पक्षनेत्या, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128