[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईत अनधिकृत बॅनर-पोस्टरविरोधात महापालिकेची मोठी अॅक्शन

एका दिवसात ६४० बॅनर-पोस्टर हटवले

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी | मुंबई
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सार्वजनिक ठिकाणांचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत बॅनर, पोस्टर आणि फलकांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठी कारवाई करत गुरुवारी (२३ जुलै) एका दिवसात तब्बल ६४० अनधिकृत बॅनर आणि पोस्टर हटवले. यामध्ये सर्वाधिक ३३६ राजकीय, १८६ धार्मिक आणि ११८ व्यावसायिक स्वरूपाच्या बॅनर-पोस्टरचा समावेश आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या निर्देशानुसार आणि उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अनुज्ञापन विभागाने ही विशेष मोहीम राबवली. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय लावण्यात आलेले फलक, बॅनर आणि पोस्टर हटविण्यात आले.
महापालिकेने स्पष्ट केले की, मुंबईतील अनधिकृत होर्डिंग, बॅनर आणि पोस्टरविरोधातील मोहीम नियमितपणे राबविली जाते. केवळ फलक हटविण्यावरच न थांबता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात नियमानुसार दंडात्मक कारवाईही केली जाते.
महापालिका प्रशासनाने नागरिक, सामाजिक संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की, महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सार्वजनिक रस्ते, पदपथ किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कोणतेही होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावू नयेत. अन्यथा अशा साहित्याचे तातडीने निष्कासन करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128