[t4b-ticker]
ब्रेकिंग

भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यात गणेशमूर्ती कोसळली; दोघांचा मृत्यू, पाच जखम

भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यात गणेशमूर्ती कोसळली; दोघांचा मृत्यू, पाच जखमी

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

भुलेश्वर परिसरात शनिवारी रात्री ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली. बळराम मर्चंट रोड, कबुतरखाना, जय अंबे चौक परिसरात गणेशमूर्ती अचानक कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलींचाही समावेश आहे. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी रात्री सुमारे ९.५१ वाजता गणेशमूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस, १०८ रुग्णवाहिका तसेच महापालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नव्हती; मात्र त्यानंतर रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
रिलायन्स रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत नेवसे (वय ३३) यांना रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले.
जी. टी. रुग्णालयात तीन जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी बृजेश हेमंत जोशी (वय ३०) यांना रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले. तर वैभव घेनंद (वय ३८) आणि पवन चौरसिया (वय २५) यांच्यावर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जेजे रुग्णालयातही तीन जखमींना दाखल करण्यात आले. त्यामध्ये लावण्या गनेर (वय ५), दिव्या गनेर (वय ७) आणि कुणाल काशीद (वय २६) यांचा समावेश आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
साईफी रुग्णालयात या दुर्घटनेतील कोणताही जखमी दाखल झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत एकूण ७ जण बाधित झाले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू आणि पाच जण जखमी झाले आहेत. गणेशमूर्ती आगमनाच्या गर्दीत ही दुर्घटना नेमकी कशी घडली, मूर्ती कोसळण्यामागे नेमके कारण काय होते आणि सुरक्षेच्या उपाययोजना पुरेशा होत्या का, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक रस्त्यावर येत असताना अशा मिरवणुकांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे विशेष गांभीर्याने पाहण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128