[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुख्यमंत्री ,सरन्यायाधीश भूषण गवई घेणार पालिकेतील विद्यार्थ्यांचा वर्गl

मुंबई महापालिकेचा ‘स्मार्ट नागरिक’ उपक्रम; ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ पुस्तिकांचे उद्या प्रकाशन

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

विशेष प्रतिनिधी मुंबई :
संविधान, लोकशाही आणि नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांचे प्रकाशन होणार आहे. विशेष म्हणजे, फडणवीस आणि गवई स्वतः विद्यार्थ्यांचा वर्ग घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
दादर पश्चिम येथील भवानी शंकर मार्ग मुंबई पब्लिक स्कूलमध्ये दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महापालिका शाळांमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कृती, चर्चा आणि अनुभवाधारित शिक्षणातून समता, बंधुता, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण संरक्षणाची मूल्ये शिकवली जाणार आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्यावर पुस्तिका
इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी प्रेरणा’ पुस्तिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, संविधाननिर्मितीतील योगदान आणि शिक्षण, समानता व सामाजिक न्यायाचे विचार सोप्या भाषेत मांडण्यात आले आहेत. या पुस्तिकेवर आधारित परीक्षा जानेवारी २०२७ मध्ये होणार असून, एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, सजग आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128