[t4b-ticker]
ब्रेकिंग

11-12 ऑगस्टला मुंबईतील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत; बीएमसीचा इशारा, आताच पाणी साठवून ठेवा

वैतरणा जलवाहिनीच्या कामासाठी 24 तासांचा मेगाब्लॉक; एच पूर्व विभागात पूर्ण पाणीबंदी, के दक्षिणमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील सांताक्रूझ (पूर्व), वांद्रे (पूर्व), बीकेसी, देशांतर्गत विमानतळ परिसरासह अनेक भागांतील नागरिकांना ११ आणि १२ ऑगस्ट रोजी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. २४०० मिमी व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीवरील महत्त्वाच्या कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून २४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर के दक्षिण विभागातील अनेक भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
महापालिकेकडून के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते बुधवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
या भागात पूर्ण पाणीबंदी
एच पूर्व विभागात देशांतर्गत विमानतळ, हँगर कर्मचारी वसाहत, एअर इंडिया वसाहत, सांताक्रूझ (पूर्व), वांद्रे रेल्वे टर्मिनस, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), तसेच वांद्रे (पूर्व) परिसरात २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. १२ ऑगस्ट रोजीही संपूर्ण एच पूर्व विभाग, सांताक्रूझ (पूर्व), खार (पूर्व) आणि वांद्रे (पूर्व) येथे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
के दक्षिण विभागात कमी दाबाने पाणी
के दक्षिण विभागातील कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपूरा, देऊळवाडी, मासळी बाजार, घाटीवाडा, चकाला, पी अँड टी वसाहत, कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर (सहार रोड), मोगरापाडा, सहार गाव, सुतार पाखडी आणि कार्गो संकुल या भागात वेगवेगळ्या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
बीएमसीचे नागरिकांना आवाहन
महापालिकेने नागरिकांना आधीच आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती केली असून, जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128