[t4b-ticker]
ब्रेकिंग

महिलांच्या सक्षमीकरणाला महापालिकेचा बूस्टर;

दिव्यांग पेन्शन, बचत गटांचे खेळते भांडवल पुन्हा सुरू होणार

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई

: महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण, दिव्यांग व्यक्तींना आधार आणि महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे, महिला बचत गटांना २५ हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल देणे, महिलांसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण सुरू करणे आणि भांडूप येथील महिला भवनाच्या कामाला गती देणे, असे निर्णय घेण्यात आले.
महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती मीनल संजय तुर्डे यांच्या दालनात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि महापालिका प्रशासनाची बैठक झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समिती अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या प्रयत्नातून भांडूप येथे उभारण्यात येणाऱ्या महिला भवनाच्या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. महिला भवनाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाल्यानंतर इमारत व बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दीड वर्षांपासून बंद असलेली दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू
सन २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पात्र दिव्यांग व्यक्तींना पेन्शनचा लाभ देण्याचे आदेश समितीने दिले. त्यामुळे दीड वर्षांपासून आर्थिक मदतीपासून वंचित असलेल्या दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे.
महिला बचत गटांना २५ हजारांपर्यंत खेळते भांडवल
गेल्या दीड वर्षापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला बचत गटांसाठीही बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बचत गटांना देण्यात येणारे कमाल २५ हजार रुपयांचे खेळते भांडवल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही अंतिम टप्प्यात असून मंजुरी मिळाल्यानंतर बचत गटांना निधी वितरित केला जाणार आहे. या निर्णयामुळे महिला बचत गटांना व्यवसाय उभा करण्यासाठी तसेच सुरू असलेले उपक्रम विस्तारण्यासाठी आर्थिक आधार मिळणार आहे.
विभागनिहाय व्यवसाय प्रशिक्षण
महिलांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभागनिहाय व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला. प्रशिक्षणासाठीची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील महिलांना त्यांच्या गरजेनुसार विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या बैठकीला श्रीमती मीनाताई कांबळी, माजी नगरसेविका श्रीमती शीतल म्हात्रे आणि श्रीमती संजना घाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महानगरपालिका उपआयुक्त (शिक्षण) तथा संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, प्रमुख समाज विकास अधिकारी भास्कर जाधव, समाज विकास अधिकारी वेदिका पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती खांडेकर, विभा जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महिला भवन, दिव्यांग पेन्शन, बचत गटांना खेळते भांडवल आणि व्यवसाय प्रशिक्षण या चारही निर्णयांमुळे महिलांना स्वावलंबी करण्यासोबतच दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार देण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128