[t4b-ticker]
ब्रेकिंग

माहीम चौपाटीवर पुन्हा रंगणार कोळी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद

मुंबईचा पहिला ‘सी फूड प्लाझा’ सुरू; महिला बचत गटांच्या स्टॉल्सवर ताज्या मासळीच्या चविष्ट पदार्थांची मेजवानी

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

आठवड्यातून चार दिवस संधी; बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सायंकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सुरू राहणार
मुंबई : ताज्या मासळीचे चविष्ट पदार्थ, कोळी संस्कृतीचा साज आणि समुद्रकिनाऱ्यावरील आल्हाददायक वातावरण… मुंबईकरांसाठी ही खास मेजवानी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच मुंबईच्या पारंपरिक कोळी खाद्यसंस्कृतीला पर्यटनाची जोड देणारा मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ माहीम चौपाटी परिसरात पुन्हा सुरू झाला आहे. शनिवार, २४ ऑक्टोबरपासून येथे महिला बचत गटांचे स्टॉल्स सुरू झाले असून, आता आठवड्यातून चार दिवस मुंबईकरांना विविध मासळीजन्य पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत हा प्लाझा खुला राहणार आहे. त्यामुळे मासळीच्या पारंपरिक चवींसोबतच कोळी खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या मुंबईकरांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

महिला बचत गटांना आर्थिक बळ
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोळीवाड्यांचे सुशोभीकरण, स्थानिक खाद्यसंस्कृतीचे संवर्धन आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती या उद्देशाने माहीम चौपाटीलगत सी फूड प्लाझा सुरू केला. गेल्या काही वर्षांत हजारो पर्यटकांनी या ठिकाणाला भेट दिली आहे. महिला बचत गटांतील सदस्यांना मत्स्य उत्पादनांवर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांची व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावरही भर देण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक व्यवसायांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कोळी खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करून परिसरातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्याचाही महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.
रोषणाई, सेल्फी पॉइंट आणि कोळी गीतांची रंगत
सी फूड प्लाझा परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला असून, नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट आणि आरामदायी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे. कोळी गीतांची रंगत आणि विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद यामुळे या ठिकाणी खास वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते तथा जी उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार, मराठी अभिनेते कमलाकर सातपुते, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि महिला बचत गटांच्या सदस्य उपस्थित होत्या.
कोळी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन
मुंबईतील कोळीवाडे आणि तेथील खाद्यसंस्कृती ही शहराची खास ओळख आहे. या वारशाचे जतन करण्यासोबतच महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांनी माहीम सी फूड प्लाझाला मोठ्या संख्येने भेट देऊन कोळी संस्कृती आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128