[t4b-ticker]
महाराष्ट्र

शब्दगंध हे सर्वसामान्यांचे हक्काचे विचारपीठ- प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे

लिखाणातून एक नवीन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

पाथर्डी ( प्रतिनिधी) “लिखाणातून एक नवीन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि ती सकारात्मक ऊर्जा जन सामान्यांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची भूमिका शब्दगंध करत असुन ही आनंदाची बाब आहे ” असे प्रतिपादन बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे यांनी केले.शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य शाखा पाथर्डी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.पुढें बोलतांना ते म्हणाले की, शब्दगंध हे सर्व सामान्यांचे विचारपिठ असून नवोदितांना इथे संधी मिळत आहे.यावेळी १५ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात सर्वानी सहभागी व्हावे व कवी, लेखकांनी आपले साहित्य प्रकाशित करावे,असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. अनिल पानखडे यांनी केले . याप्रसंगी बाबूजी आव्हाड महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे यांचे संत कबीरांचे दोहे हे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल, श्री.तिलोक जैन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक दौंड यांची अहमदनगर जिल्हा स्काऊट अँड गाईड च्या सहाय्यक आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला, शाहीर भारत गाडेकर यांचा उत्कृष्ट समाजकार्याबद्दल , श्री. बंडू गाडेकर यांचा स्कॉलरशिप मार्गदर्शिका तयार करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल , प्रा.डॉ.अशोक डोळस यांचा उल्लेखनीय लिखानाबद्दल सन्मान करण्यात आला. संघर्ष आणि प्रेरणा याचे अतूट नाते आहे.संघर्षातूनच प्रेरणा निर्माण होते.लेखकांनी अनिष्ट शोधून काढून प्रबोधनात्मक विचार शब्दबद्ध करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ.जी.पी.ढाकणे यांनी व्यक्त करून सत्कारमूर्तींना समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक आणि स्वागत शब्दगंध साहित्यिक परिषद पाथर्डी चे उपाध्यक्ष प्रा.संतराम साबळे यांनी केले.श्री चंद्रकांत उदागे यांनी आभार मानले. यावेळी प्रा.डॉ.अशोक डोळस , श्री विजय शिंदे , श्री.प्रशांत रोडी , श्री राजेंद्र उदारे, श्री.संदीप भागवत,अथर्व पानखडे,कृष्णा पानखडे आदी उपस्थित होते. यावेळी काव्य संमेलनात सहभागी होण्यासाठी कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128